नजरेत जणू अंगार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपातील अभिनेत्याला पाहून चाहते भारावले
नजरेत जणू अंगार, शत्रूला करी बेजार; असेच काहीसे भाव या रुपात पाहायला मिळत आहेत. महाराजांच्या भूमिकेसाठी ऑडिशन देऊनही काही कारणास्तव ती प्रेक्षकांपर्यंत न पोहोचवता आल्याची खंत व्यक्त करणारा हा अभिनेता आहे (r madhavan) आर. माधवन.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदाक्षिणात्य आणि हिंदी अशा कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा अभिनेता पुन्हा एकदा सर्वांच्याच काळजाचा ठाव घेत आहे. तोसुद्धा अगदी हक्कानं.
माधवननं सोशल मीडियावर त्याच्या वाट्याला आलेल्या काही अशा भूमिकांचे लूक शेअर केले आहेत ज्यासाठी त्याची निवड झाली खरी, किंबहुना ज्यासाठी त्याची लूक टेस्टही झाली. पण, या भूमिकांचा प्रवास पुढं मात्र जाऊ शकला नाही.
महाराजांच्या लूकसोबतच त्यानं आणखीही काही लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत.
आपल्यापासून दूरावलेल्या आणि कधीही न साकारल्या गेलेल्या भूमिका..., असं कॅप्शन लिहित त्यानं ही पोस्ट केली.
सोशल मीडियावर त्याचे हे फोटो अतिशय वेगानं व्हायरल झाले. कोणी ते स्टेटसमध्ये ठेवले, कोणी त्याच्या रुपाची दाद दिली तर, कोणी भूमिका साकारल्या न गेल्याचं कारणही विचारलं.
एक अभिनेता म्हणून आर. माधवन याचं प्रेक्षकांशी असणारं नातं, आणि छत्रपती शिवरायांबाबत सर्वांच्याच मनात असणारं आदराचं स्थान याचीच प्रचिती यावेशी सोशल मीडियावर पाहायला मिळाली. (सर्व छायाचित्रं- R. Madhavan/ फेसबुक)
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शिवप्रताप दिनाच्या दिवशी एका अतिशय लोकप्रिय अभिनेत्यानं त्याचं अनोखं रुप प्रेक्षकांसमोर आणलं.
महाराष्ट्रासाठी दैवत असणाऱ्या आणि दिल्लीच्या तख्तापर्यंत आपल्या कामगिरीची छाप सोडणाऱ्या, गनिमांना घाम फोडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्वताइतक्या कारकिर्दीवर आजवर कलाविश्वानं शक्य त्या परिनं प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेक कलाकारांनी महाराजांच्या भूमिका साकारण्याचं शिवधनुष्य पेललं आहे. मुख्य म्हणजे राजांवर असणाऱ्या प्रेमापोटी या कलाकारांना प्रेक्षकांचीही उस्त्फूर्त दाद मिळाली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -