कार्तिक आर्यन अवघ्या 23 वर्षीय सुंदर अभिनेत्रीच्या प्रेमात? दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण!
कार्तिक आर्यन आजघडीला बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक झाला आहे. कोणताही गॉडफादर नसताना त्यान बॉलिवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजघडीला कार्तिक आर्यनचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. याच अभिनेत्यासोबत सध्या एका अभिनेत्रीचे नाव जोडले जात आहे.
विशेष म्हणजे ही अभिनेत्री अवघ्या 23 वर्षांची असून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.
23 वर्षांच्या अभिनेत्रीचे नाव श्रीलीला आहे. या अभिनेत्रीने एकूण दोन मुलांना दत्तक घेतलेलं आहे. म्हणजेच सध्या ती दोन मुलांचं आई म्हणून संगोपन करत आहे.
अलीकडेच कार्तिक आर्यनची आई माला तिवारी यांना तुम्हाला कशी सून हवी आहे, असे विचारण्यात आले होते. यावर उत्तर देताना मला एक डॉक्टर सून हवी आहे, असं त्यांनी उत्तर दिलं होतं.
त्यांच्या या उत्तरानंतर कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांच्या अफेअरच्या चर्चांना जास्तच बळ मिळालं आहे. कारण श्रीलालदेखील एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.
श्रीलालाचा जन्म 14 जून 2001 रोजी झाला आहे. तिने आतापर्यंत तेलुगु, कन्नड भाषेतील मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे.
सिनेसृष्टीत काम करण्यास श्रीलालाला सुरुवातीला तिच्या घरच्यांनी विरोध केला होता.
मात्र तिच्या जिद्दीपुढे कुटुंबीयांनी माघार घेत तिला चित्रपटांत काम करण्यास सहमती दरशवली.
एकीकडे एमबीबीएसचे शिक्षण घेत असतानाच श्रीलालाला 2021 साली चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तिने कानडी भाषेतील एका चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका केली होती. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही.
श्रीलाला अगदीच आलिशान आयुष्य जगते. कोईमोईच्या रिपोर्टनुसार तिच्या संपत्तीचे मूल्य 15 कोटी रुपये आहे.
करिअरच्या सुरुवातीला तिने चित्रपटात काम करण्यासाठ एका तासाला 4 लाख रुपये याप्रमाणे फी घेतली होती. आजघडीला ती चित्रपटात काम करण्यासाठी चार कोटी रुपये घेते.
दरम्यान, लवकरच कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांचा एक चित्रपट येणार आहे.
या चित्रपटाचे नाव अद्याप ठरवलेले नाही मात्र त्याचा एक टिझर व्हिडीओ जारी करण्यात आला होता. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
श्रीलीला