Mumbai Accident: होळीसाठी फुले आणायला गेलेल्या तिघांना शिवनेरी बसने चिरडलं; एकाचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai Accident: शिवनेरी बस चालक ब्रिजवरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आला.
Mumbai Accident
1/6
बेधडकपणे गाडी चालवणाऱ्या शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडल्याची घटना मुंबईतील प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री 2.30 वाजता घडली.
2/6
प्रणय बोडके(29), करण शिंदे (29)आणि दुर्वेश गोरडे हे तिघेजण स्कुटर वरून परेल वरून दादरला होळीसाठी फुले आणण्यास चालले होते.
3/6
समोरून शिवनेरी बस चालक ब्रिजवरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आला. आणि त्याने तिघांना चिरडले.
4/6
सदर घटनेत प्रणय बोडके याचा केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुर्वेश आणि करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
5/6
इकबाल शेख असे चालकाचे नाव असून तो MSRTC ची निळ्या रंगाची बस MH12VF3305 चालवत होता.
6/6
चालक पळून जाण्याच्या तयारीत असताना उपस्थित लोकांनी त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले.
Published at : 13 Mar 2025 11:47 AM (IST)