IN PICS | 'Fat to Fit' फरदीन खान; घटवलं 18 किलो वजन
दिवंगत अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा, अभिनेता फरदीन खान याला नुकतंच आलिम हकिन या सेलिब्रिची हेअरस्टायलिस्टच्या सलूनबाहेर पाहिलं गेलं. त्याचा फिटनेस पाहून अनेकांना धक्काच बसला. छायाचित्रकारांनीही या अभिनेत्याची एक झलक टीपण्याची संधी सोडली नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवजन वाढल्यामुळं फरदीनची सोशल मीडियावर खिल्ली उडवली गेली होती.
खुद्द फरदीननंही आपल्या या प्रवासाबाबत माहिती देत टीकेचा सामना कसा केला होता आणि स्वत:मध्ये हा बदल नेमका कसा घडवून आणला याचा खुलासा एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केला होता.
फरदीनचा हा फीट लूक पाहता येत्या काळात तो कोणत्या चित्रपटात झळकणार का, असेच तर्क चाहत्यांनी लावले.
दरम्यान, फॅट टू फीट असा प्रवास करणाऱ्या फरदीननं तब्बल 18 किलो वजन घटवलं आहे.
2016 मध्ये माध्यमांमध्ये आलेल्या फरदीनच्या छायाचित्रानं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. इथं तो कलाविश्वातील दिवसांपेक्षा अतिशय वेगळा दिसत होता. (सर्व छायाचित्रे- मानव मंगलानी)