Arjun Kapoor वर इतकं प्रेम का करते Malaika Arora, मलाईकानं सांगितलं खास कारण
फोटो
1/6
मलाइका अरोरा आणि अर्जून कपूर यांची लव्हस्टोरी बॉलिवूडमधील चर्चित लव्हस्टोरींपैकी एक आहे. जवळपास तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत.
2/6
अर्जूनसोबत डेट करण्याआधी मलाईका अरबाज खानची पत्नी होती. दोघांनी सामजस्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी दिली.
3/6
रिपोर्टस् नुसार मलाईका अरबाजसोबत नात्यात असतानाच अर्जूनला पसंत करु लागली होती. दोघांची सोडचिठ्ठी झाली आणि अर्जूनसोबतचं नातं ऑफिशियल झालं.
4/6
एका मुलाखतीत मलाईकाला अर्जूनबाबत विचारलं. अर्जूनची कोणती अशी गोष्ट आहे जी तुला सर्वात जास्त पसंत आहे, त्यावर तिनं सांगितलं की, जो मला समजून घेतो, मला हसवतो, मला खूश ठेवतो. त्यामुळं आमचं नातं जुळलं.
5/6
तिनं आणखी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, आम्ही आमचं नातं लपवलेलं नाही. आम्ही लग्नही करणार आहोत. ज्यावेळी करु त्यावेळीही सांगू. आमच्याकडे नातं लपवण्याचं कुठलंही कारण नाही.
6/6
अर्जून आणि मलाईकामध्ये 12 वर्षांचं वयाचं अंतर आहे. त्यावर मलाईकानं म्हटलं होतं की, यामुळं आम्हाला फरक पडत नाही. आपल्या समाजातच गडबड आहे. जास्त वयाचा पुरुष कमी वयाच्या मुलीशी लग्न करतो तर ती अभिमानाची गोष्ट म्हणून मिरवली जाते. कुणी स्त्री असं करत असेल तर मात्र चूक कसं होऊ शकतं, असं मलाईकानं म्हटलं होतं.
Published at : 21 Mar 2021 07:30 AM (IST)