Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Valentine Week 2021 : आमिरच्या मुलीनं अशा प्रकारे दिली प्रियकरासोबतच्या नात्याची कबुली
'परफेक्शनिस्ट' अभिनेता आमिर खान याच्या मुलीनं तिच्या खासगी आयुष्याबाबत कायमच सर्वांना माहिती दिली आहे. नैराश्याचा सामना करणं असो किंवा मग जीवनातील खास व्यक्तीबाबत बोलणं असो. इरानं कायमच सर्वांशी संवाद साधत तिचं मन मोकळं करण्याचा प्रयत्न केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्य म्हणजे नुपूर आणि इरा या दोघांच्याही कुटुंबीयांना त्यांच्या नात्याची माहिती आहे. त्यामुळं येत्या काळात या सेलिब्रिटी जोडीबाबतही बऱ्याच गोष्टी आणि त्यांच्या नात्याचा प्रवास उलगडणार हे नक्की. (सर्व छायाचित्रं- इरा खान / इन्स्टाग्राम)
नुपूर आणि आमिरच्या लेकीचं हे नातं सर्वांसमोर अधिकृतपणे आल्यामुळं सोशल मीडियायवर अनेकांनीच या सेलिब्रिटी कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.
It’s an honour to make promises with and to you,” असं कॅप्शन देत नुपूरसोबतच्या नात्याबाबतच्या आपल्या भावना तिनं व्यक्त केल्या.
व्हॅलेंटाईन्स डेच्यानिमित्तानं साजरा केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकमधील 'प्रॉमिस डे'च्या दिवशी नुपूरसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
मागील काही दिवसांपासून याबाबतच्या चर्चा सुरु होत्या. त्यावरच जणू इरानं शिक्कामोर्तब केलं आहे. ही खास व्यक्ती म्हणजे आमिरचा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे.
अशी ही आमिरची लाडाची लेक एका खास व्यक्तीच्या प्रेमात आहे तिनंच याची ग्वाही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -