'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय अभिषेक बच्चनचं नाव; ऐश्वर्याशी लग्नापूर्वीही रंगलेल्या अफेअर्सच्या चर्चा!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक बच्चन आणि निमरीत कौर यांचं अफेअर सुरू असल्याच्या चर्चांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये उधाण आलं आहे. पण, दुसरीकडेच या सर्व अफवा असल्याचंही बोललं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिषेक बच्चनचं नाव सध्या अभिनेत्री निम्रत कौरसोबत जोडलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निम्रतमुळेच अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये अंतर निर्माण झालं आहे.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली असून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत.
बऱ्याच काळापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, दोघांनी याबाबत मौन बाळगलं आहे. ऐश्वर्यासोबत लग्ना करण्यापूर्वी अभिषेकचं नाव इतरही अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं.
अभिषेक बच्चनचं नाव अभिनेत्री दीपानिता शर्मासोबतही जोडलं गेलं होतं आणि दोघेही तब्बल 10 महिने एकमेकांना डेट करत होते.
अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बंटी और बबली आणि युवा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे एकमेकांच्या जवळ आले होते.
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर दोघांच्या रिलेशनशिपबाबत तर अनेकांना माहिती आहेच. दोघांची एंगेजमेंटसुद्धा झाली होती, पण नंतर लग्न मोडलं. स्वतः जया बच्चन यांनी करिश्मा आणि अभिषेकच्या लग्नाची घोषणा मीडियासमोर केली होती.
सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या वेगवेगळे स्पॉट होतात. ते दोघे एकत्र कुठेच एकत्र दिसत नाहीत. त्यामुळे सध्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी आम्ही मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे केवळ माहिती म्हणून पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)