छोटा पुढारी, कोकण हार्टेड गर्ल ते परदेशी गर्ल, यंदाच्या 'बीग बॉस मराठी'तील स्पर्धक नेमके कोण आहेत? जाणून घ्या सविस्तर
नव्वदचे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर बिग बॉसच्या घरातील पहिल्या स्पर्धक ठरल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'रमा राघव' मालिकेतील अभिनेता निखिल दामले बिग बॉसच्या घरात आला आहे.
कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय नायिका योगिता चव्हाण बीग बॉसच्या घरात आली आहे.
कोकण हार्टेड गर्ल म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर यावेळी बीग बॉस मराठीची महत्त्वाची स्पर्धक आहे.
गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांना खळखळून हसवणारा पंढरीनाथ कांबळे (पॅडी) हादेखील बीग बॉसच्या घरात आला आहे.
भाग्य दिले तू मला मालिकेनंतर प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचीदेखील बीग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.
पहिला इंडियन आयडॉल अभिजित सावंतची बीग बॉसच्या घरात एन्ट्री झाली असून त्याचे चाहते चांगलेच खूश आहेत.
छोटा पुढारी म्हणून लोकप्रिय असलेला घनश्याम दरवडेही आता बीग बॉसमध्ये दिसणार आहे.
प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री तसेच परदेसी गर्ल म्हणून ओळख असलेली इरिना रुडाकोला बीग बॉसच्या घरात आली आहे.
हिंदी बीग बॉस गाजवणारी निक्की तांबोळीचीही बीग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.
झी मराठीवरील 'मनं झालं बाजिद' फेम अभिनेता वैभव चव्हाणची बीग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.
मराठमोळी रॅपरगर्ल आर्या जाधवही यावेळी बीग बॉस मराठीची स्पर्धक असेल. त्यामुळे आर्या नेमका कसा खेळ खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रसिध्द रिलस्टार धनंजय पोवार देखील यंदा बीग बॉसच्या घरात दिसतील.
गुलिगत धोका आणि बुक्कीत टेंगूळ हा डायलॉग ज्याच्यामुळे प्रसिद्ध झाला तो रिल स्टार सुरज चव्हाण हादेखील यावेळी बीग बॉसमध्ये झळकणार आहे.
प्रसिध्द कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील हेदेखील यावेळी बीग बॉस मराठीचे महत्त्वाचे स्पर्धक असणार आहेत.
स्प्लिट्सव्हिलाचे 15 वे पर्व गाजवलेला अरबाज पटेलही यावेळी बीग बॉसच्या घरात असणार आहे.