15-15-15 चा फॉर्म्यूला तुम्हाला 15 वर्षांत करणार करोडपती, जाणून घ्या नेमकं कसं?
करोडपती होणं ही फार मोठी बाब नाही. गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडल्यास तुम्ही पुढच्या काही वर्षांत कोट्यधीश होऊ शकता. 15-15-15 या सूत्राच्या मदतीने तुम्ही कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फॉर्म्यूल्याच्या मदतीने तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी पुढची 15 वर्षे गुंतवणूक केली तर तुमच्या वयाच्या 40 व्या वर्षी तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.
15-15-15 या सूत्राचा अवलंब करत तुम्ही मुच्यूअल फंडात गुंतवणूक केल्यास तुमचे कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला म्युच्यूअल फंडात एसआयपी करावी लागेल.
एसआयपीचा भांडवली बाजाराशी जोडलेली असते. त्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून पैसे गुंतवणे जोखीच्या अधीन असते. पण दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला यात चांगले रिटर्न्स मिळू शकतात.
एसआयपीच्या माध्यमातून केलेल्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुम्हाला 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात, असे गृहित धरले जाते. एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचाही फायदा होतो. त्यामुळे एसआयपीमध्ये तुम्हाला 15 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळू शकतात.
15-15-15 या सूत्रानुसार तुम्ही प्रत्येक महिन्याला 15,000 रुपयांप्रमाणे 15 वर्षांसाठी 15 टक्क्यांनी रिटर्न्स देणाऱ्या फंडात एसआयपी केल्यास तुमचे कोट्यधीश होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.
तुम्ही 15 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये गुंतवले आणि तुम्हाला 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले असे गृहित धरले तर तुम्ही एकूण 27,00,000 रुपयांची गुंतवणूक कराल.
तुम्ही गुंतवलेल्या या रकमेववर एकूण 74,52,946 रुपयांचे व्याज मिळेल. म्हणजेच 15 वर्षांनी तुम्हाला 01,52,946 रुपये मिळतील. तुम्ही गुंतवलेल्या एसआयपीवर तुम्हाला 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले असे गृहित धरल्यास तुम्हाला कोट्यधीश होण्यासाठी एकूण 17 वर्षे गुंतवणूक करावी लागेल. 17 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 1,00,18,812 रुपये मिळतील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)