‘बिग बॉस’मध्ये धमाल उडवणाऱ्या अभिनेत्री रश्मी देसाईची ‘लॉक अप’मध्ये एंट्री!
Lock Upp : कंगना रनौतचा (Kangana Ranaut) रिअॅलिटी शो ‘लॉक अप’ (Lock Upp) छोट्या पडद्यावर धमाल करत आहे. (photo:imrashamidesai/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सामील झाले आहेत, जे आपल्या सर्व सुविधा सोडून तुरुंगात राहत आहेत. या शोमधून प्रेक्षकांना सेलेब्सची अनेक गुपिते कळत आहेत. (photo:imrashamidesai/ig)
चेतन हंसराजने अलीकडेच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या शोमध्ये प्रवेश केला आहे. दर्शक दिवसभर OTT प्लॅटफॉर्मवर शो पाहू शकतात. आता या शोमध्ये एक नवीन एंट्री होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, ‘बिग बॉस’मध्ये धमाल उडवणारी अभिनेत्री रश्मी देसाईची एंट्री या शोमध्ये होऊ शकते. (photo:imrashamidesai/ig)
मीडिया रिपोर्टनुसार रश्मी देसाई या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. रश्मीने अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. (photo:imrashamidesai/ig)
तसेच, रश्मीच्या एण्ट्रीबाबत निर्मात्यांकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. रश्मीचे चाहते तिच्या एण्ट्रीची वाट पाहत आहेत. (photo:imrashamidesai/ig)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या बातम्यांनुसार, रश्मी देसाई या शोची 16वी स्पर्धक असणार आहे. आता रश्मी एकता कपूरच्या या शोमध्ये कैदीच्या भूमिकेत दिसणार आहे. (photo:imrashamidesai/ig)
रश्मी शोमध्ये आल्याची बातमी ऐकून चाहते खूप खूश झाले आहेत. अनेक लोक रश्मीला सपोर्ट करत आहेत. (photo:imrashamidesai/ig)