Bal Gandharva Birth Anniversary : नंदिनी, सुभद्रा, देवयानी अन् रुक्मिणी; असा बालगंधर्व आता न होणे!
नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बाल गंधर्व यांची आज जयंती आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाल गंधर्व हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते होते.
हुबेहुब रंगवलेल्या स्त्री भूमिकांमुळे बाल गंधर्वांना चांगलीच लोकप्रियता मिळाली.
संगीत सौभद्र, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर, संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला अशी बाल गंधर्व यांची अनेक नाटके गाजली आहेत.
बाल गंधर्वांना भारत सरकारने 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरविले.
नारायण श्रीपाद राजहंस यांनी वयाच्या 10 व्या वर्षी लोकमान्य टिळकांनी 'बाल गंधर्व' ही पदवी प्रदान केली आहे.
बाल गंधर्व यांनी वयाच्या 19 व्या वर्षी 'शकुंतला' या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण केलं.
बाल गंधर्वांच्या मधुर आवाजाचा मोठा चाहतावर्ग होता.
नंदिनी, सुभद्रा, देवयानी, रुक्मिणी अशा अनेक भूमिकांच्या माध्यमातून त्यांची प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
चेहऱ्यावर काय स्मित हास्य आणि शांत स्वभाव असणाऱ्या बालगंधर्वांचे वयाच्या 79 व्या वर्षी 1967 साली निधन झाले.