Ram Mandir Inauguration: अवघं बॉलिवूड प्रभु श्रीरामाच्या चरणी सेवेत अयोध्येत अवतरलं!
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला अवघे काही तास शिल्लक आहेत. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरातील रामभक्तांनी ज्या क्षणाची एवढी वर्षे वाट पाहिली तो अखेर आता जवळ आला आहे. (Photo Credit : PTI)
प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. (Photo Credit : PTI)
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अजय देवगन, सनी देओल, हेमा मालिनी, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कंगना रनौत, मधुर भंडारकर, संजय लीला भन्साळी, चिरंजीवी, रजनीकांत, ऋषभ शेट्टी, यश, प्रभास, मोहनलाल, माधुरी दीक्षित, विकी कौशल, कतरिना कैफ हे सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. (Photo Credit : PTI)
धनुष, शंकर महादेवन, रणदीप हुड्डा, पवन कल्याण, दिपिका चिखलिया, हेमा मालिनी, ज्युनियर एन्टीआर, मोहनलाल, मनोज मुंतशीर, एसएस राजामौली, रोहित शेट्टी, राजकुमार हिरानी, आयुष्मान खुराना, जॅकी श्रॉफ, राम चरण, अक्षय कुमार, अल्लू अर्जुन, सरोद वादक अमजद अली असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित असणार आहेत. (Photo Credit : PTI)
प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं विविध क्षेत्रातील 2500 मंडळींना निमंत्रण देण्यात आलं आहे. (Photo Credit : PTI)
बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील मंडळी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित असतील. अनेक सेलिब्रिटींचे अयोध्येतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo Credit : PTI)
आज (22 जानेवारी 2024) अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. भारतीयांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असणार आहे. (Photo Credit : PTI)
प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा देशभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉएने दिलेल्या माहितीनुसार, आज कोणत्याही बॉलिवूड सिनेमाचं शूटिंग होणार नाही. एकंदरीतच बॉलिवूडमध्ये आज लॉकडाऊन असेल. मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी असणार आहे. (Photo Credit : PTI)
अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास पाच शतकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12.29 ते 12:30 पर्यंत राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याची वेळ असेल. प्राणप्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त असेल. (Photo Credit : PTI)