वयाच्या 34 व्या वर्षी अभिनेत्री नीना गुप्ताची लेक मसाबा होणार आई..
बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) ही लवकरच आजी होणार आहे. कारण तिची लेक मसाबा गुप्ता हिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन गुडन्यूज शेअर केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिने तिच्या नवऱ्यासोबत बेबी बंर दाखवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. सध्या मसाबाचे (Masaba Gupta) हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मसाबा आणि सत्यदीप मिश्राचे मागील वर्षी जानेवारीत लग्न झाले होते.
वयाच्या 34 व्या वर्षी मसाबा ही आई होणार आहे. तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोवर बऱ्याच कमेंट्स देखील येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचप्रमाणे अनेकांनी मसाबाचं अभिनंदन देखील केलंय. त्यामुळे सध्या नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता या मायलेकीची जोडी बरीच चर्चेत आलीये.
नीना गुप्ता 80 च्या दशकात वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी लग्न केले नाही आणि 1989 मध्ये त्यांना एक मुलगी झाली, तिचे नाव मसाबा आहे.
विवियन आधीच विवाहित असल्याने नीना सिंगल मदर झाली आणि मसाबाला वाढवले. 2008 मध्ये नीनाने अमेरिकेतील दिल्लीस्थित सीए विवेक मेहरासोबत लग्न केले.
आजी झाल्याचा आनंद व्यक्त करताना नीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, आमच्या मुलांच्या मुलाचे आगमन होणार आहे, यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते.'
मसाबा गुप्ताने 2015 मध्ये निर्माता मधु मंटेनासोबत लग्नगाठ बांधली होती. पण तीनच वर्षात त्यांचं हे नातं तुटलं. त्यांनी 2018 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला
त्यानंतर मसाबाने मागील वर्षी म्हणजेच 27 जानेवारी 2023 मध्ये सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं. सत्यदीप मिश्रा हा अदिती राव हैदरचा एक्स नवरा आहे. 2013 मध्ये अदिती आणि त्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. (ऑल फोटो :masabagupta/ig )