जीवनात ही घडी अशीच राहू दे... अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या सहजीवनाची 35 वर्ष;जाणून घ्या सदाबहार लव्हस्टोरी
डार्लिंग डार्लिंग या नाटकादरम्यान निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांची पहिली भेट झाली. त्या नाटकामध्ये निवेदिता यांचे वडील काम करत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिवेदिता यांना शाळेला सुट्टी असताना त्यांचे वडील गजानन जोशी त्यांना एकदा नाट पाहायला घेऊन गेले. त्यावेळी त्यांची आणि अशोक सराफांची भेट झाली.
त्यानंतर अनेक वर्षांनी नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमाच्या निमित्ताने ते दोघे एकत्र आले. या सिनेमात त्या दोघांना एकत्र कोणाताही सीन नव्हता. त्यामुळे शेवटच्या सीनच्या वेळी त्यांची भेट झाली.
पण सिनेमात निवेदिता सराफ या अशोक सराफ यांच्या बहिण होत्या. याबद्दलचा अनुभव अशोक सराफांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला होता.
नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमानंतर त्यांनी तू सौभाग्यवती हो यामध्ये एकत्र काम केलं. पण तेव्हाही एकमेकांशी काहीही बोलणं झालं नाही.
त्यांची खरी ओळख ही धुमधडाका सिनेमामुळे झाली. तेव्हा अशोक सराफांनी निवेदिता यांना तुला मनासारखा नवरा मिळू दे असं म्हटलं होतं.
या सिनेमानंतर त्यांनी मामला पोरींचा हा सिनेमा केला आणि त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली.
त्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. पण या दोघांमध्ये तब्बल 18 वर्षांचं अतंर होतं. त्यामुळे निवेदिता यांच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.
तसेच सिनेसृष्टीतल्या कोणत्याही कलाकारासोबत निवेदिता यांनी लग्न करु नये अशी त्यांच्या आईची इच्छा होती.
पण निवेदिता या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. यामध्ये त्यांच्या बहिणीने त्यांना खूप मदत केली आणि त्यांचं लग्न पार पडलं.