Asha Bhosle Birthday : आशा भोसलेंचा आज वाढदिवस, सुरांच्या सहाय्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशा भोसले. (Photo:@asha.bhosle/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआशा भोसले यांचा जन्म मंगेशकर कुटुंबातला असून त्यांना मास्टर दीनानाथांचा गाण्याचा वारसा मिळाला. (Photo:@asha.bhosle/IG)
आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरुवात माझा बाळ या चित्रपटातून केली. १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटांतही अनेक गाणी गायली खरी, पण ते चित्रपट विशेष गाजले नाहीत.(Photo:@asha.bhosle/IG)
हिंदी चित्रपट गीतांचा विचार करता आशा भोसले यांनी एस.डी.बर्मन यांच्यापासून ते ए.आर. रहमानपर्यंतच्या विविध कालखंडांतील, अनेक प्रकारच्या संगीतकारांबरोबर काम केले आहे. (Photo:@asha.bhosle/IG)
मराठीतही दत्ता डावजेकर-श्रीनिवास खळे यांच्यापासून ते श्रीधर फडके यांच्यापर्यंत असंख्य संगीतकारांच्या रचनांना त्यांनी सुरेल साज चढवला आहे.(Photo:@asha.bhosle/IG)
आशा भोसले यांना अनेक पुरस्कार मिळाले. 2021 सालचा महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रभूषण पुरस्कार देखील त्यांना दिला आहे.(Photo:@asha.bhosle/IG)
उपशास्त्रीय संगीत, मराठी भावगीते, मराठी-हिंदी चित्रपट गीत्गे, नाट्यगीते, गझली, लावण्या, डिस्को-रॉक-पॉप गाणी, अन्य भाषांतील गाणी - अशा सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये आशाताई तेवढ्याच ताकदीने गायल्या आहे.
(Photo:@asha.bhosle/IG)
(Photo:@asha.bhosle/IG)