बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितही पोहचली जामनगरला; अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये सहभागी होणार!
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. ( Photo Credit : manav manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. ( Photo Credit : manav manglani)
करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाने माधुरीच्या बुडत्या करिअरची दिशाच बदलून टाकली ( Photo Credit : manav manglani)
अनंत अंबानी (Anant Ambani ) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांच्या प्री वेडिंग फंक्शनची जोरदार चर्चा सुरू आहे. ( Photo Credit : manav manglani)
रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) जुलैमध्ये वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत (Radhika ) लग्नगाठ बांधणार आहे ( Photo Credit : manav manglani)
मात्र, त्यापूर्वी 1 ते 3 मार्च दरम्यान गुजरातच्या जामनगरमध्ये या प्री-वेडिंगचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. ( Photo Credit : manav manglani)
लग्नाआधीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक बड्या व्यक्ती जामनगरला पोहोचल्या आहेत. अमिताभ बच्चन, सलमान खान आणि शाहरुखपासून दीपिका पदुकोणसह अनेक स्टार्सही जामनगरला पोहोचले आहेत. माधुरी दीक्षितही या सोहळ्यात पतीसह उपस्थित राहणार आहे. ( Photo Credit : manav manglani)