Anant-Radhika First Wedding Pics : साजिरी गोजिरी जोडी ही जबर... लाखात एक 'अनंत-राधिका' मेड फॉर इच अदर! कपलचा पहिला क्यूट फोटो समोर

मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लग्नबंधनात अडकला आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत-राधिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा चालू होती. अखेर बीकेसी मधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.

लग्नानंतर अनंत-राधिकाचा पहिला फोटो समोर आला आहेत, ज्यात वधू-वर इतके क्यूट दिसत आहेत की त्यांच्यापासून नजर हटवणं कठीण होत आहे.
अंबानी कुटुंबीयांनी लग्नमंडपात रॉयल एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं.
नववधू राधिकाचा लूक मीडियासमोर आला नव्हता, परंतु आता तिच्या लूकचे अनेक सुंदर फोटो समोर आले आहेत.
लग्नासाठी राधिकाने डिझायनर अबू जानी संदीपच्या 'पाणेतर' कलेक्शनमधील खास गुजराती लेहेंगा परिधान केला होता. लग्नसोहळ्यातील पहिला लूक अबू जानी – संदीप खोसला यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला.
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये शुक्रवारी (12 जुलै) सायंकाळपासून सुरुवात झाली.
अनंत अंबानी संध्याकाळी 4 वाजता आपल्या वधूच्या लग्नाच्या मिरवणुकीसह अँटिलियाहून निघाले.
संगीत वाद्यांसह नवरा मुलगा लग्नाच्या ठिकाणी पोहोचला, जिथे संपूर्ण कुटुंबाने फोटोशूट केला.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे सर्व विधी शुक्रवार आणि शनिवारी मध्यरात्री 12.30 च्या दरम्यान पूर्ण झाले.
जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वैदिक रितीरिवाजांनुसार लग्न पार पडलं.
वडील मुकेश अंबानी आणि आई नीता अंबानीच्या आशीर्वादाने अनंतने आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली.
सध्या सोशल मीडियावर अंबानी कुटुंबियांचाच बोलबाला पाहायला मिळत आहे.