Ambani latest news: अनंत आणि राधिकाचा दिमाखदार विवाह सोहळयाला दिग्गजांची मंदियाळी
अंबानी कुटुंबात लगीन घाई सुरू आहे. यावेळी अंबानी कुटुंबियाचे अनेक फोटो समोर येत आहेत. यामध्ये सिनेसृष्टीतले कलाकारांपासून भारतातील आणि परदेशातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे.

Ambani family
1/9
देशातील आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींच्या (Anant Ambani) विवाह सोहळ्यात राजकीय मंडळींसोबत उपस्थित राहणार आहेत. विविध पक्षांचे नेते आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
2/9
शाही विवाह सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी पार पडणार आहे.गुजरातमधील जामनगरमध्ये आणि परदेशात क्रूझवर प्री-वेडिंग फंक्शन पार पडले होते.या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते.
3/9
प्री-वेडिंग फंक्शन ला बॉलीवुड सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रीची मांदियाळी पाहायला मिळाली दबंग चा भाईजन पासून रितेश जेनेलिया देशमुख, सर आली खान, कियारा आडवाणी, विक्की कौशल, शाहिद कपूर, करण जोहर, नीतू कपूर आदी कलाकारांनी हजेरी लावली.
4/9
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा
5/9
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
6/9
जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार विवाह सोहळा अनंत-राधिकाचा विवाहसोहळा 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. 13 जुलै रोजी शुभ आशिर्वाद कार्यक्रम पार पडणार आहे.
7/9
नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी देशातील जेष्ट मंडळी उपस्थिति दर्शवणार आहेत. 14 जुलै रोजी ग्रॅण्ड वेडिंगचे ग्रॅण्ड रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.
8/9
बीकेसी येथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक 23 कडे जाणारी वाहने अमेरिकन कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाण्यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे.
9/9
त्याशिवाय, भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क, गोदरेज, बीकेसी येथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक 23 कडे जाणारी वाहने अमेरिकन कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाण्यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे.
Published at : 11 Jul 2024 05:59 PM (IST)