Amruta Khanvilkar : सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट्स आणि ट्रोलिंग करणाऱ्यांवर अमृता भडकली!
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सगळेच सेलिब्रिटी सोशल मीडियाचा वापर करतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेते-अभिनेत्री हे आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दलही सोशल मीडियाच्या माध्यमातून देतात. सण-उत्सव आणि काही कार्यक्रमातील फोटोही शेअर करतात.
अनेकदा ट्रोलिंगलाही सेलेब्सना सामोरे जावे लागते. अनेक कलाकार फोटो, व्हिडीओवर येणाऱ्या कमेंट्सकडे दुर्लक्षही करतात.
मात्र, अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) आपला संताप व्यक्त केला आहे. एका स्त्री च्या प्रतेय्क गोष्टी वर किती …किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये? असा सवाल करत तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे असे ट्रोलर्स, आक्षेपार्ह कमेंट्स करणाऱ्यांना सुनावले आहे
अभिनेत्री अमृता खानविलकरही सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. अमृता आपले फोटो, नवीन प्रोजेक्टसबद्दलची माहिती चाहत्यांना देत असते.
मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी अमृताने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.
अभिनयाच्या क्षेत्रात असल्यामुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे .
पण ट्रॉलिंगच्या नावाखाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात की लाज वाटते असे अमृताने म्हटले.
आशा करते तुमचा गुढी पाडवा छान साजरा झाला असेल... नव्या वर्षाची सुरुवात तुम्ही मागच्या गोष्टी विसरून केलीच असणार...नवीन मनोकामना ... नवी स्वप्ने ...देवा चरणी ठेऊन त्या पूर्ण व्हाव्या अशी प्रार्थना केली असणार ...(photo:amrutakhanvilkar/ig)
जर तुम्ही हे सगळं केलंय तर तुमच्या सारखीच मी सुद्धा आहे मीदेखील हेच केलं ... कारण मी हि फक्त नावाने नाही तर धर्माने मराठी आहे ... संस्काराने मराठी आहे ... मूळची कोकणातील ...पण जन्म मुंबई चा आहे ... मी हि कोणाची तरी मुलगी आहे ...बहीण आहे ... मावशी आहे...ताई आहे...मैत्रीण आहे ...बायको आहे आणि मग मी ज्या क्षेत्रात काम करते त्यामुळे मी एक अभिनेत्री आहे.
तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेले काही दिवस नवीन कामाच्या निमित्ताने मी वेग वेगळे interviews देत आहे .... वेग वेगळ्या प्लॅटफॉर्म्स वर .... आता ह्या क्षेत्रात असल्या मुळे कधीतरी चांगलं कधीतरी वाईट हे ऐकण्याची सवय झालीच आहे ... पण ट्रॉलिंग च्या नावा खाली इतक्या घाणेरड्या आणि लाजिरवाण्या गोष्टी प्रेक्षक बोलतात कि लाज वाटते .... वेषभूशा असो ... हसणं असो .. बोलणं असो ...एका स्त्री च्या प्रतेय्क गोष्टी वर किती …किती बोलायचं ? आणि त्याला काही सीमा का नाहीये ? जे लोक स्वतःचं खरं नाव किंव्हा साधा DP सुद्धा लावत नाहीत अशी लोक बोलतात ? मज्जा वाटते तुम्हाला ? मला असं वाटतं तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे .... सोशल मीडिया चा चांगला वापर सगळ्यांनाच करता येतो असं नाहीये .... पण ह्या वर जे तुम्ही लिहिता ... बोलता .... ह्यात फक्त आणि फक्त तुमचे संस्कार दिसतात असो.