Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याचे पोस्टर लॉंच!

Amruta Fadnavis Song : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. (photo:Lamruta.fadnavis/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. 'व्हॅलेंटाईन डे'ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. (photo:Lamruta.fadnavis/ig)

आता त्यांनी त्यांच्या आगामी 'शिव तांडव स्त्रोतम' या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (photo:Lamruta.fadnavis/ig)
अमृता फडणवीस यांनी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी शंकराच्या अवतारातील स्वत:चा फोटो शेअर करत नव्या गाण्याची घोषणा केली होती. (photo:Lamruta.fadnavis/ig)
फोटो शेअर करत त्यांनी लिहिले होते,मी तुझी निवड आता कायमस्वरुपी केली आहे. तू माझ्या हृदयात, मनात आणि श्वासातही आहेस. 'व्हॅलेंटाईन डे' हा आपल्या जवळच्या व्यक्तींच्या प्रेमासाठी ओळखला जातो. त्यादिवशी मी माझ्या रुद्राला एक संगीतमय प्रार्थना अर्पण करते. (photo:Lamruta.fadnavis/ig)
मंगळवारी त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये अमृता फडणवीस शंकराच्या अवतारात दिसत आहेत. (photo:Lamruta.fadnavis/ig)
. अमृता फडणवीसांचे हे नवे गाणे भोलेनाथवर आधारित आहे. हे गाणे अमृता फडणवीसांनी गायले असून शैलेश दाणीने या गाण्याचे बोल लिहिले आहेत. 'शिव तांडव स्त्रोतम' असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता फडणवीसांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. (photo:Lamruta.fadnavis/ig)