In Pics: बिग बी अमिताभ बच्चन ते सलमान खान, या बॉलिवूड सेलिब्रिटींच्या झाल्या आहेत मोठ्या सर्जरी
2020 हे वर्ष अनेक वाईट घटनांनी देखील लक्षात राहिल. त्यातली एक म्हणजे अभिनेता इरफान खान यांचा मृत्यू. इरफानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर होता. त्यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती देखील दिली होती. त्यांच्यावर अनेक दिवस लंडनमध्ये उपचार सुरु होते. शेवटी 51 वर्षाच्या वयात मार्च 2020 मध्ये इरफान यांचं निधन झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडमधील दबंग अभिनेता सलमान खान एका गंभीर आजारातून सावरला आहे. 2007 साली त्याला न्यूरोपॅथिक विकार, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया झाला होता. या आजारावर उपचारासाठी त्याला 2011 साली अमेरिकेला जावं लागलं होतं. त्यानंतर परत येऊन त्यानं 'एक था टायगर'चं शूटिंग केलं.
बॉलिवूडचे महानायक बिग बी अभिताभ बच्चन यांना कुली सिनेमाच्या शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळं त्यांना 25 ऑगस्ट 1982 साली मुंबईच्या ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं मोठं ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यानंतर नव्या जोमानं परतले.
2013 साली बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनच्या मेंदूची मोठी सर्जरी झाली. मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ही सर्जरी करण्यात आली. 'बँग बँग' चित्रपटाच्या शूटिंगवेळी स्टंट करताना त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.
भारतीय क्रिकेटर युवराज सिंह याला देखील जीवनात संघर्ष करावा लागला आहे. 2011 च्या वर्ल्डकपनंतर युवराजला कॅन्सर झाल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉक्टरांनी तो पुन्हा खेळू शकणार नाही असं सांगितलं मात्र तरीही हिंमत न हारता त्यानं मैदान गाजवलं.
अभिनेत्री मनीषा कोयरालाला 2012 मध्ये कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर ती तात्काळ उपचारासाठी अमेरिकेला गेली. आणि उपचार घेऊन ठीक होऊन परतली.
90 च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री सोनाली बेंद्रेला वयाच्या 44 व्या वर्षी कॅन्सरचं निदान झालं. तिनं सोशल मीडियावर मेटास्टेटिक कॅन्सर झालं असल्याचं सांगितलं. तिच्यावर उपचार सुरु आहेत. आता ती कॅन्सरवर मात करत असून पुन्हा सक्रिय झाली आहे.
सिनेक्षेत्रातील अनेक कलाकारांना कॅन्सरसह अन्य आजारांचा सामना करावा लागला आहे. यातील काही सेलिब्रिटींनी हिंमत दाखवत आणि वेळेवर उपचार घेत आजारावर मात केली आहे. मात्र काही सेलिब्रिटी मात्र जग सोडून गेले. आज अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आपण जाणून घेऊयात.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -