In Pics | सावळे सुंदर, रुप मनोहर... विठ्ठल मंदिराला एक टन फुलांची सजावट
एक टन फुलांची आकर्षक सजावट विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखांबी व सभामंडप येथे केली आहे
या भाविकाने झेंडू , शेवंती , बिजली , ऑर्केड , गुलाब , जरबेरा या फुलांची रंगसंगती वापरली आहे.
आज माघ द्वितीय - तृतीया असून मंदिर समितीने या भाविकांस या सजावटीला परवानगी दिली.
पुण्यातील श्रीकांत घुंडरे व काळुराम थोरात याना विठुरायाचे मंदिर फुलांनी सजविण्याची इच्छा होती.
महत्त्वाचे सण , उत्सव या काळात विठ्ठल मंदिराला विविध प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात येत असते. मात्र कोणताही उत्सव नसताना पुण्यातील भाविकाने आज विठ्ठल मंदिरात आकर्षक फुल सजावट करीत आपली इच्छा पूर्ण केली आहे.
मात्र आज कोणताही खास दिवस नसल्याने ही सजावट करता येईल का शंका होती.
वर्षातील सर्वच महत्त्वाच्या दिवसाला फुलांची सजावट करणारे भाविक ठरले असल्याने इतर भाविकांना ही फुल सजावट करण्याची संधी मिळत नाही.