Amir Khan New Girlfriend: आमिर खानच्या गर्लफ्रेंडला आहे 6 वर्षांचा मुलगा; कोण आहे गौरी स्प्रॅट?

बॉलीवूड अभिनेता आमिर खान (Amir Khan) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आमिर खान तिसऱ्यांदा प्रेमात पडला आहे. त्याने स्वतःच याबाबत माहिती दिली आहे.

आमिर खान दीड वर्षांपासून गौरीला डेट करतोय.
गौरी स्प्रॅट असं तिचं नाव असून ती आमिरची 25 वर्षांपासूनची मैत्रीण आहे.
गौरी स्प्रॅटही बंगळुरूची रहिवासी असून ती आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये काम करते.
गौरीला सहा वर्षांचा मुलगा देखील आहे.
गौरीने ब्लू माउंटन स्कूलमधून शिक्षण घेतलं आणि 2004 मध्ये लंडनच्या कला विद्यापीठातून एफडीए स्टायलिंग केल्याची माहिती आहे.
गौरीची मीडियाला ओळख करून देण्यापूर्वी आमिर खानने सलमान खान आणि शाहरुख खानसोबत बोलून गौरीची ओळख करून दिली.
आमिर खानचं पहिलं लग्न रीना दत्तासोबत 1986 मध्ये झालं आणि त्यांचा 2006 मध्ये घटस्फोट झाला.
रीना दत्तासोबत घटस्फोट झाल्यानंतर आमिरने चित्रपट निर्माती किरण रावसोबत लग्न केलं. मात्र, त्यांचासुद्धा 2021 मध्ये घटस्फोट झाला.