Yami Gautam: अभिनेत्री यामी गौतम 'या' आजारामुळे त्रस्त!
Yami Gautam : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करते. (photo:yamigautam/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. काही दिवसांपूर्वी यामीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. (photo:yamigautam/ig)
या पोस्टमधून तिने तिला झालेल्या त्वचेच्या केराटोसिस पिलेरिस (Keratosis Pilaris) या आजाराबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती. (photo:yamigautam/ig)
गेली अनेक वर्ष यामी या आजाराचा सामना करत आहे. यामीने या आजारबद्दल वाटणारी भीती सोडून त्याचा सामना कसा करावा हे सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितले होते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये यामीने तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवर चाहत्यांनी दिलेल्या रिअॅक्शनबद्दल सांगितले. (photo:yamigautam/ig)
मुलाखतीमध्ये यामीने सांगितले, 'माझ्यासाठी ती पोस्ट लिहिणं हे अवघड काम नव्हतं. त्या पोस्टमधून मी व्यक्त झाले. मला या रोगाबाबत कळल्यापासून ते मी पोस्ट शेअर करेपर्यंतचा प्रवास हा आव्हानात्मक होता. जेव्हा लोक मला शूटमध्ये बघत होते, तेव्हा ते मला हा आजार लपवण्याचा सल्ला देत होते. मला या गोष्टीचा खूप त्रास झाला. त्यामुळे व्यक्त होण्यासाठी मी ती सोशल मीडिया पोस्ट शेअर केली. त्या पोस्टला अनेक लोकांची चांगली रिअॅक्शन मिळाली. त्यामुळे मला खूप आनंद झाला.' (photo:yamigautam/ig)
हा त्वचेच्या संबंधीत आजार आहे. यामध्ये चेहऱ्यावर लहान पिंपल्स येतात. आता बऱ्याच वर्षांपासून मी याचा सामना केला आणि आज शेवटी, मी भीती आणि असुरक्षितता सोडून देण्याचा निर्णय घेतला. तसेच मी माझ्या दोषाला मनापासून स्विकारायचे ठरवले. म्हणून मी माझे सत्य तुमच्यासोबत शेअर करण्याचे धाडस केले.' असं यामीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले होते. (photo:yamigautam/ig)
यामीने बाला, सनम रे, काबिल, विकी डोनर आणि उरी या हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामीने चांद के पार चलो या मालिकेमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. (photo:yamigautam/ig)