Yami Gautam: अभिनेत्री यामी गौतम बनली एका मुलाची आई, ठेवले 'हे' नाव!

बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यामी एका मुलाची आई झाली आहे. जेव्हापासून अभिनेत्रीने ती आई होणार असल्याची घोषणा केली होती, तेव्हापासून तिचे चाहते तिच्या खास दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते.

ता अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर सांगितले आहे की तिने अक्षय तृतीयेच्या दिवशी तिच्या मुलाचे स्वागत केले आहे.
यामी गौतमने तिच्या इंस्टाग्रामवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. तिने सोशल मीडियावर आई होण्याची गोड बातमी पोस्टसह शेअर केली.
अभिनेत्रीने सांगितले की ती एका मुलाची आई झाली आहे, ज्याला तिने अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी म्हणजेच 10 मे रोजी जन्म दिला.
यासोबतच यामी गौतमने तिच्या मुलाचे नावही चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
यामी गौतम आणि आदित्य धर यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'वेदाविद' ठेवले आहे
प्रेग्नेंसी पोस्ट शेअर करताना जोडप्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, 'आम्ही सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. विशेषत: आम्ही डॉ. भूपेंद्र अवस्थी आणि डॉ. रंजना धनू यांचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो, ज्यांच्यामुळे हा विशेष दिवस आमच्या आयुष्यात आला.
यामी पुढे म्हणाली, आम्ही आता पालक होण्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात केली आहे आणि आम्ही आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची वाट पाहत आहोत. (pc:yamigautam/ig)