एका आठवड्यात 'हे' पाच पेनी स्टॉक ठरले रॉकेट, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
गेल्या आठवड्यात पेनी स्टॉक्सने गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स दिले आहेत. एका स्टॉकने तर आठवड्यात 80 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. गेल्या आठवड्यात शेअर बाजार पाच नव्हे तर सहा दिवस चालू होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवारी डिझास्टर रिकव्हरी साईटची टेस्टिंग करण्यात आली होती. त्यामुळे शनिवारी बाजार चालू होता.
ज्या शेअर्सची किंमत फार कमी असते, त्यांना पेनी स्टॉक्स म्हटले जाते. पेनी स्टॉक्सची किंमत कमी असली तरी अशा स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे हे रिस्की मानले जाते.
फार्मा सेक्टरच्या कंपनी जेनफार्मासेक लिमिटेड (Genpharmasec) या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दवशी 7.56 टक्क्यांनी तेजी आली. पूर्ण आठवड्यात 22 टक्क्यांची तेजी आल्यामुळे हा शेअर 2.43 रुपयांवर पोहोचला आहे.
गेल्या आठवड्यात चांगली कामगिरी करणाऱ्या पेनी स्टॉकमध्ये अद्विक कॅपिटल (Advik Capital) या कंपनीचाही समावेश आहे. या स्टॉकमध्ये आठवड्याभरात 23 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. शनिवारी हा शेअर 1.41 टक्क्यांनी वाढून 2.87 रुपयांवर बंद झाला.
सवाका बिझनेस मशीन्स (Sawaca Business Machines) या कंपनीनेही आठवड्यभरात गुंतवणूकदारांना 27 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. शनिवार हा शेअर 6.45 टक्क्यांनी वाढून 1.65 रुपयांवर बंद झाला.
लीडिंग लीजींग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट (Leading Leasing Finance And Investment) या कंपनीचा शेअरही आठवड्याभरात 82 टक्क्यांनी वाढला. हा शेअर शनिवारी 8.22 टक्क्यांनी वाढून 3.95 रुपयांवर बंद झाला.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)