The Dirty Picture पाहून Vidya Balan च्या आई- वडिलांनी अशी प्रतिक्रिया दिली की....
विद्याला बोल्ड लूक आणि सोबतच दमदार अभिनय या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना पाहता आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये विद्या बालन हिनं सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी तिची समीक्षक आणि चाहत्यांनीही प्रशंसा केली होती.
चित्रपट पाहताना एकाही क्षणारा आपल्याला पाहून पालकांना संकोचलेपणा वाटला नाही, हीच आपल्याला मिळालेली सर्वात मोठी आणि हवीहवीशी वाटणारी प्रतिक्रिया असल्याचं विद्यानं सांगितलं.
टाळ्या वाजवत त्यांनी आपल्याला या चित्रपटात आपली मुलगी दिसलीच नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली. ऑनस्क्रीन आपल्या मुलीचे प्राण गेल्याचं पाहून विद्याच्या आईला अश्रू अनावर झाले होते.
एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणं विद्याच्या आईवडिलांनी ज्यावेळी पहिल्यांदाच हा चित्रपट पाहिला, त्यावेळी ती थोडी घाबरली होती. ते आपल्याविषयी कसा विचार करतील, याचं द़डपण तिला आलं होतं. पण, प्रत्यक्षात मात्र स्क्रिनिंगनंतर वडिलांनी जेव्हा विद्याची भेट घेतली तेव्हा काही वेगळंच घडलं.
अभिनेत्री विद्या बालन हिनं आजवर अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत सर्वाधिक महत्त्वाचा चित्रपट ठरला, तो म्हणजे 'द डर्टी पिक्चर'
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -