अभिनेत्री शर्वरीच्या आयटम साँगची जोरदार चर्चा; मुंज्या सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) दिग्दर्शित 'मुंज्या' (Munjya) सिनेमा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवगंत नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची नात शर्वरी वाघ (Sharvari Wagh) ही देखील झळकणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या या सिनेमातील एका गाण्यामुळे शर्वरी चर्चेत आलीये. मुंज्या सिनेमात शर्वरी आयटम साँगमध्ये दिसणार आहे. तिच्या या बोल्ड लूकची जोरदार चर्चा सुरु आहे.
येत्या 7 जून रोजी मुंज्या हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलरही भेटीला आला होता. त्यानंतर या सिनेमातील आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
तरस हे या सिनेमातलं गाणं असून यामध्ये शर्वरी वाघ दिसत आहे. तिच्या घायाळ करणाऱ्या अदांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय.
स्त्री आणि भेडियानंतर मॅडॉक फिल्म्सकडून पुन्हा एकदा नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा येत्या 7 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित हा सिनेमा विशेषकरुन कोकणाती मुंज्या या भूतावर असल्याचं सांगण्यात येत आहे.
या चित्रपटात शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा आणि सत्यराज या कलाकारांचा समावेश आहे. मॅडॉक फिल्म्स प्रोडक्शन, मुंज्याची निर्मिती विजान आणि अमर कौशिक यांनी केली आहे.
शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांची नात आहे. तिने 'द फरगॉटन आर्मी- आझादी के लिये' या वेबसिरिजमधून तिच्या अभियनच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
या सिरिजच्या आधी लव्ह रंजन आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. आता ती एका आयटम साँगमध्ये झळकणार आहे. या गाण्यावर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या या लूकचं कौतुकही केलं आहे. या सिरिजच्या आधी लव्ह रंजन आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. आता ती एका आयटम साँगमध्ये झळकणार आहे. या गाण्यावर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या या लूकचं कौतुकही केलं आहे. या सिरिजच्या आधी लव्ह रंजन आणि संजय लीला भन्साळी यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. आता ती एका आयटम साँगमध्ये झळकणार आहे. या गाण्यावर अनेकांनी कमेंट्स करत तिच्या या लूकचं कौतुकही केलं आहे. (pc:sharvari/ig)