PHOTO : ‘दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा…’, रसिका सुनीलचा ‘महाराष्ट्र दिना’निमित्त खास मराठमोळा अंदाज!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 May 2022 10:53 AM (IST)
1
1 मे रोजी राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कलाकार देखील हटके अंदाजात चाहत्यांना शुभेच्छा देतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अभिनेत्री रसिका सुनील हिने देखील अशाच खास आणि हटके शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत.
3
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत रसिकाने खास मराठमोळ्या अवतारात फोटोशूट केलं आहे.
4
नऊवारी साडी, नाकात नथ, डोक्यावर फेटा असा रसिकाचा खास मराठमोळा अंदाज खूपच सुंदर दिसतोय.
5
‘K2Fashion closet’साठी रसिकाने हे फोटोशूट केलं असून, हे फोटो योगेंद्र चव्हाण यांनी टिपले आहेत.
6
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी जवळपास 106 जणांनी आपले बलिदान दिले. या हुतात्म्यांचे स्मरण 1 मे रोजी केले जाते.