आणीबाणीचा इतिहास रुपेरी पडद्यावर, कंगनाचा बहुचर्चित 'इमर्जन्सी' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!
कंगना रणौत ही एक भारतीय सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असून तिने प्रामुख्याने हिंदी चित्रपटांत काम केलेले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2006 साली प्रदर्शित झालेल्या 'गँगस्टर' या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
2006 सालानंतर कंगना 'वो लमहे', 'शाकालाका बूम बूम', 'लाईफ इन अ मेट्रो', 'क्वीन', 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' अशा अनेक चित्रपटांत झळकली.
2014 मध्ये आलेल्या क्वीन चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
दरम्यान, आता पुन्हा एकदा कंगना रणौत ही तिच्या इमर्जन्सी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी भूमिका केलेली आहे.
या चित्रपटात कंगना रणौतने भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारलेली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
इमर्जन्सी या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर तसेच अभिनेत्री कंगना रणौत, महिमा चौधरी, भूमिका चावला यासारखे दिग्गज कलाकार आहेत. 1975 साली लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर हा चित्रपट आधारलेला आहे.
हा एक चरित्रात्मक राजकीय चित्रपट असून तो 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगनाने या चित्रपटासाठी अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती अशी तिहेरी भूमिका पार पाडली आहे.