Janhvi Kapoor: अभिनेत्री जान्हवी कपूर बॉयफ्रेंड शिखरसोबत संसार थाटणार? लग्नावर बोलताना नेमकं काय म्हणाली?
अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी तिच्या प्रोफेशनल लाईफप्रमाणेच पर्सनल लाईफमुळेही खूप चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया याच्यासोबत अनेकदा दिसली. ही जोडी वेळोवेळी सर्वांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. मंदिरात जाणं असो किंवा बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये हे दोघे नेहमी एकत्र दिसतात.
जान्हवी कपूरने एका मुलाखतीत शिखरसोबत लग्न करण्याबाबत तिने सांगितलं की, 'मी सध्या माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. लग्नाबाबत मला किंवा त्याला सध्या वेळ नाही.
जान्हवी आणि शिखर सध्या रिलेशनमध्ये आहेत आणि स्वत:चं व्यावसायिक आयुष्य आणि डेटिंग लाईफ इन्जॉय करत आहेत. मात्र, सध्या तरी दोघांचा लग्नाचा कोणताही विचार नसल्याचं जान्हवीने मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने हे वक्तव्य केलं आहे.
जान्हवीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'तिला मासिक पाळी सुरू झाल्यावर ती दर महिन्याला ब्रेकअप करायची. सुरुवातीला दोन-तीन महिने बॉयफ्रेंडही शॉकमध्ये व्हायचा, पण त्यानंतर त्यालाही हे कळलं आणि मग जान्हवीने ब्रेकअप केल्यावर तो त्यावर 'इट इज ओके' म्हणायचा. जान्हवी पुढे म्हणाली की, त्यानंतर दोन दिवसांनी मी रडत त्याच्याकडे जायचे आणि सॉरी म्हणायचे. असंही तिने सांगितलं.
जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया आधी डेट करत होते आणि नंतर त्यांचे ब्रेकअप झालं होतं.
अभिनेत्री जान्हवी कपूर सुधांशू सारिया दिग्दर्शिक 'उलझ' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा दमदार ट्रेलर समोर आला होता, ज्यामध्ये ती IFS ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. 'उलझ' चित्रपटात जान्हवी कपूरसोबत गुलशन देवय्या, रोशन मॅथ्यू, आदिल हुसैन, राजेंद्र गुप्ता, राजेश तैलंग, मियांग चांग आणि जितेंद्र जोशी हे कलाकार तिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसतील.