काळ्या बुरख्यात दिसली अभिनेत्री हिना खान, चाहत्यांना दिल्या रमजानच्या शुभेच्छा!
कालपासून पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. इस्लामच्या सर्वात पवित्र महिन्यांपैकी एक, रमजान महिन्याची सुरुवात प्रत्येक मुस्लिम नमाज आणि उपवासाने करतो.(photo:realhinakhan/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसर्वसामान्यांपासून ते अनेक मुस्लीम सेलिब्रिटीदेखील रमजान महिन्याचे स्वागत विशेष प्रार्थना करत आहेत. अभिनेत्री हिना खाननेही रमजान महिन्याची खास पद्धतीने सुरुवात केली...(photo:realhinakhan/ig)
बोल्ड आणि ग्लॅमरस हिना खान पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीला बुरख्यात दिसली. अभिनेत्रीने काळ्या बुरख्यातील तिचे साधे फोटो शेअर केले आहेत.(photo:realhinakhan/ig)
एका फोटोत हिना खान तिच्या आईसोबत दिसत आहे. अभिनेत्रीची आई देखील हिनाप्रमाणे काळा बुरखा आणि काळा सनग्लासेसमध्ये दिसत आहे.(photo:realhinakhan/ig)
चाहत्यांनी हिना खानचे ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटो नेहमीच पाहिले आणि पसंत केले आहेत, परंतु बुरख्यातील अभिनेत्रीचा लूक देखील चाहत्यांकडून पसंत केला जात आहे.(photo:realhinakhan/ig)
हिनाच्या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर अनेकांनी अभिनेत्रीला रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.(photo:realhinakhan/ig)
हिना खाननेही डोक्यावर स्कार्फसह काळा बुरखा घातला आहे. हिनाने बुरख्यासोबत काळा सनग्लासेसही लावला आहे.(photo:realhinakhan/ig)