Gehraiyaan Memories : सिद्धांत चतुर्वेदीने शेअर केल्या ‘Gehraiyaan’च्या खास आठवणी, फोटोत दिसला रोमँटिक अंदाज!
सिद्धांत चतुर्वेदी त्याच्या आगामी ‘Gehraiyaan’ या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. दीपिका पदुकोणसोबत तो पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहे. या चित्रपटाशी संबंधित आठवणी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिद्धांत चतुर्वेदीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून 'Gehraiyaan' चित्रपटाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
या पोस्टमध्ये त्याने या चित्रपटातील महत्त्वाची व्यक्तिरेखा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भावना प्रेक्षकांसमोर मांडल्या आहेत. त्याने हा चित्रपट अतिशय खास आणि वेगळा असल्याचे सांगितले आहे.
केवळ सिद्धांत चतुर्वेदीच नाही, तर या चित्रपटातील प्रत्येक कलाकार 'Gehraiyaan' चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. नात्यांचं एक वेगळं रूप या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. त्याचा ट्रेलर आधीच खूप लोकप्रिय झाला आहे.
दीपिकाने तिच्या अनेक मुलाखतींमध्येही या चित्रपटाचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्यासाठी हा केवळ चित्रपट नसून, एक भावना आहे.
सिद्धांतचा दीपिकासोबतचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. या चित्रपटात दोघांनीही अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन्स दिले आहेत. तिच्या या सीन्सचीही बरीच चर्चा होत आहे. (All PC: siddhantchaturvedi/IG)