सनी देओलच्या 'बॉर्डर-2' मध्ये झळकणार पंजाबी अभिनेता, साकारू शकतो 'ही' दमदार भूमिका!
अभिनेता दिलजीत दोसांझने आपल्या आवाजाने भारतातच नाही तर देश विदेशातही लोकांना वेड लावलं आहे. आपला अभिनय, गितांच्या जोरावर तो रोज चर्चेत असतो. (P.C diljitdosanjh)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिलजीत लवकरच अभिनेता सनी देओलसोबत 'बॉर्डर 2'मध्ये धमाल उडवणार आहे. 'बॉर्डर 2'या चित्रपटासाठी निर्मात्याने दिलजीतला अप्रोच केलं आहे. (P.C diljitdosanjh)
पीपींग मून सिनेविषयक वृत्त संकेतस्थळाच्या रिपोर्टनुसार सूत्रांनी सांगितलं की, दिलजीत 'बॉर्डर 2'मध्ये दिसू शकतो. चित्रपटात तो एक आर्मी ऑफिसर म्हणून दिसण्याची शक्यता आहे. (P.C diljitdosanjh)
अभिनेता दिलजीत दोसांझने फक्त पंजाबी चित्रपटांतच नाही तर बॉलिवूडच्या चित्रपटांतही आपल्या अभिनयाने तसेच आवाजाने जनतेवर भुरळ घातली आहे. (P.C diljitdosanjh)
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार दिलजीत 172 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. (P.C diljitdosanjh)
अभिनय क्षेत्रातही दिलजीतने आपला ठसा उमटवला असून अभिनयातूनही त्याला चांगली कमाई होते. एका शोसाठी दिलजीत 4 कोटी रुपये फिस घेतो. (P.C diljitdosanjh)
दिलजीत दोसांझ याआधी 'द क्रू' आणि 'गुड न्यूज' यासारख्या हिंदी चित्रपटातही दिसलेला आहे. (P.C diljitdosanjh)