Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss OTT 3 Winner: ट्युशन घेऊन 200 रुपये कमवायची, आता कोटींची मालकीण, बीग बॉस ओटीटीची विनर सना मकबूल कोण आहे?
रणवीर शौरी, सना मकबूल, साई केतन राव, नेजी आणि कृतीका मालिक बिग बॉस ओटीटी 3 चे टॉप फाईनालिस्ट होते. पण या सर्व स्पर्धकांवर मात करत सना मकबूल बिगबॉस ओटीटी 3 ची विजेती ठरली आहे. (P.C divasana)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसना मकबूल मूळची मुंबईची आहे. तिचा जन्म 13 जून 1993 साली महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये झाला. सना मकबूलचं नाव अगोदर सना खान होतं, परंतु पुढे तिने तिच्या नावासमोर आपल्या वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली. सनाच्या वडिलांचं नाव मकबूल खान आहे. (P.C divasana)
बिग बॉस ओटीटी 3 ची विजेती सना मकबूलने आपलं शिक्षण मुंबईमध्ये पूर्ण केलेलं आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार सनाने इयत्ता 12 वी प्रर्यंतचे शिक्षण मुंबई पब्लिक शाळेतून पूर्ण केले आहे. तसेच आरडी नॅशनल कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच सना लहान मुलांचे ट्युशन घेत असे. ट्युशनमधून तिला प्रत्येक विद्यार्थ्याकडून 100 -200 रुपये फी म्हणून मिळायचे. (P.C divasana)
सना इयत्ता 8 वीला असताना तिला पहिल्यांदा फोन वापरायला मिळाला. ती सर्वांत अगोदर नोकिया 1100 फोन वापरायची. वयाच्या 15 व्या वर्षी तिला पहिली जाहिरात भेटली. त्या जाहिरातीचे तिला 10 हजार रुपये भेटले होते. 2009 साली सना रियालिटी शो 'एमटीव्ही'वर पहिल्यांदा दिसली. त्यानंतर 2012 मध्ये 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेमध्ये तिने 'फेमिना मिस ब्यूटिफुल स्माइल'चा खिताब जिंकला होता. (P.C divasana)
खूप कमी काळात सनाने प्रसिद्धी मिळवली आहे. तिने स्टार प्लस वाहिनीच्या'इस प्यार को क्या नाम दू' या मालिकेत लावण्या नावाचं पात्र साकारलेलं आहे. (P.C divasana)
अपघातामुळे तिला तिच्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करावी लागली. त्यानंतर ती 2021 मध्ये 'खतरों के खिलाडी' या रिअॅलिटी शोच्या सेमी फाइनलपर्यंत पोहचली होती. 'खतरों के खिलाडी'च्या प्रत्येक ऐपिसोडचे तिला 2.45 लाख रुपये भेटले होते. (P.C divasana)
मिडिया रिपोर्टसनुसार सना मकबूल 2 कोटी रुपयांची मालकीण आहे. (P.C divasana)