Khatija Rahman : संगीतकार ए.आर. रहमान यांची मुलगी खतीजा रहमानचा निकाह संपन्न; पाहा फोटो!
Khatija Rahman : दिग्गज संगीत दिग्दर्शक ए.आर. रहमान (A.R. Rahman) यांची मुलगी खतीजा रहमान (Khatija Rahman) हिचा गुरुवारी निकाह पार पडला. ए.आर. रहमानने स्वतः मुलीच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.(photo:khatija.rahman/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखतीजाचे लग्न रियासदीन शेख मोहम्मद यांच्याशी झाले आहे. रहमानचा जावई रियान हा व्यवसायाने ऑडिओ इंजिनिअर आहे.(photo:khatija.rahman/ig)
इंस्टाग्रामवर लग्नाचा फोटो शेअर करताना एआर रहमानने लिहिले, ‘अल्लाह नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देवो, तुमच्या सर्व शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद. रहमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये रेहमानची पत्नी सायरा बानो, त्यांची मुले आमेन आणि रहीमा देखील दिसत आहेत. या फोटोत रहमानच्या आईचा फोटोही दिसत आहे.(photo:khatija.rahman/ig)
ए.आर. रहमानने शेअर केलेल्या फोटोमध्ये वधूच्या वेशात खतीजा दिसते आहे. खतीजा रियानजवळ बसली आहे. रहमानने आपल्या इंस्टाग्रामवर नवविवाहित जोडप्याचा फोटो शेअर केला आणि शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले आहेत.(photo:khatija.rahman/ig)
खतीजाने सोशल मीडियावर तिच्या साखरपुड्याबद्दल माहिती दिली होती.(photo:khatija.rahman/ig)
तिने पोस्ट शेअर करत लिहिले होते की, 'मला तुम्हा सर्वांना हे सांगायला अत्यंत आनंद होत आहे की, रियासद्दीन शेख मोहम्मद यांच्यासोबत माझा साखरपुडा पार पडला आहे. रियासद्दीन हे ऑडिओ इंजिनिअर आहेत. रियासद्दीन आणि माझा साखरपुडा 29 डिसेंबरला पार पडला. माझे कुटुंब आणि मित्रमैत्रीणी या सोहळ्याला उपस्थित होते.'(photo:khatija.rahman/ig)