PHOTOS : उद्धव ठाकरेंचा एक आदेश अन् 'मशालीं'नी आसमंत उजळला; अमरावती, अकोल्यातील सभेला तुफान गर्दी
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी 7 नोव्हेंबरला अमरावती, अकोल्यात जाहीर सभा घेतली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्भव ठाकरेंच्या या सभा चांगल्याच गाजल्या आहेत. सभेला लाखोंची गर्दी पाहायला मिळाली.
व्यासपीठाखालील एकही खुर्ची यावेळी खाली दिसली नाही, काही जणांनी उभं राहूनच सभा बघितली.
संपूर्ण सभास्थळ गर्दीने तुडुंब भरलं होतं. विदर्भात ठाकरे गटाला लोकांचा भरघोस पाठिबा असल्याचं पाहायला मिळालं.
यावेळी वडिलांचं भाषण ऐकण्यासाठी तेजस ठाकरे अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे स्टेजवर न बसता पब्लिकमध्ये साध्या खुर्चीत बसले होते.
महाविकास आघाडी सरकारचं काम सुरळीत सुरू असताना गद्दारी करून हे चांगलं सरकार पाडण्यात आलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महायुतीने अडीच वर्षं काहीच केलं नाही. जनाधार कमी होत चालल्याचे पाहून निवडणुकीच्या तोंडावर यांचं बहिणींसाठी प्रेम उफाळून आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्या सरकारचं काय वाईट चाललं होतं का? असा प्रश्न उपस्थितांना उद्धव ठाकरेंना विचारला. किमान 5 वर्ष पूर्ण करू द्यायची, मग मी काय वाईट करत होतो, हे बोंबलून सांगायचं, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
अडीच वर्षात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. ती कर्जमुक्ती केल्यानंतर कधीच तुमच्यासमोर येऊन या गोष्टी सांगितल्या नाहीत. कारण मी तुम्हाला कर्जमुक्त केलं, ते तुमच्यावर उपकार म्हणून नव्हे तर माझं कर्तव्य पार पाडलं होतं.
राज्यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ हे तीन भाऊ आहेत. आपण तिघे भाऊ, मिळून महाराष्ट्र खाऊ, असं त्यांचं वर्तन असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
यावेळी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ संपूर्ण जनसमुदायाने फ्लॅश लाईट पेटवून आणि मशाली पेटवून शक्तिप्रदर्शन करत त्यांना पाठिंबा दर्शवला.