Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंगलप्रभात लोढा, कालिदास कोळंबर, दिग्गज नेत्यांनी गड राखला; राजधानी मुंबईत कुणी कुणी मारली बाजी? पाहा संपूर्ण यादी
मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा विजयी झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकालिदास कोळंबकर हे वडाळा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत.
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार विजयी झाले आहेत.
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे मुरजी पटेल विजयी झाले आहेत.
कांदिवली पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल भातखळकर विजयी झाले आहेत.
अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाच्या सना मलिक या विजयी झाल्या आहेत.
माहिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार महेश सांवत विजयी झाले आहेत.
बोरीवलीमधून संजय उपाध्याय विजयी झाले आहेत.
वरळी मतदारसंघातून ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत.
शिवडी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अजय चौधरी विजयी झाले आहेत.
भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज जामसुतकर विजयी झाले आहेत.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई विजयी झाले आहेत.
दहिसर मतदारसंघातून मनिषा महायुतीच्या मनिषा चौधरी विजयी झाल्या आहेत.
विक्रोळी मतदारसंघातून ठाकरे गटाचे सुनील राऊत विजयी झाले आहेत.
मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून अबू आझमी यांचा विजय झालाय.
कुर्ला मतदारसंघातून महायुतीचे मंगेश कुडाळकर विजयी झाले आहेत.
मुलुंडमधून भाजपचे मिहिर कोटेचा विजयी झाले आहेत.
चेंबूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे तुकाराम काते विजयी झाले आहेत.
कलिना मतदारसंघातून मविआचे संजय पोतनीस विजयी झालेत.
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून हरुन खान विजयी झाले आहेत.
जोगेश्वरी मतदारसंघातून अनंत नर विजयी झाले आहेत.
अंधेरी पश्चिम मतदारसंघातून अमित साटम विजयी झाले आहेत.
मुंबादेवी मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अमिन पटेलांचा विजय झाला आहे.
मालाड पश्चिम मतदारसंघातून अस्लम शेख यांचा विजय झाला आहे.
दिंडोशी मतदारसंघातून सुनील प्रभू विजयी झाले आहेत.
चारकोप मतदारसंघातून योगेश सागर विजयी झाले आहेत.
मागाठाणे मतदारसंघातून महायुतीचे प्रकाश सुर्वे विजयी झाले आहेत.
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे पराग शाह विजयी झाले आहेत.
घाटकोपर पश्चिममधून महायुतीचे राम कदम विजयी झाले आहेत.