Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचे कागलमध्ये विराट शक्तीप्रदर्शन, म्हणाले रोहित पवार काय आणि कोणी आलं तरी..!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ आज कागल विधानसभा मतदारसंघातून विराट शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकागलमध्ये मुश्रीफ यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
आजची ही मिरवणूक विजयाची मिरवणूक असल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.
रोहित पवार काय कोणतेही नेते प्रचारासाठी आले तरी माझा विजय निश्चित असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला.
विरोधक म्हणजे पाण्यावरील बुडबुडे असल्याचे म्हणत त्यांनी समरजित घाटगेंवर जोरदार टीका केली.
तत्पूर्वी आज वसुबारस असल्याने हसन मुश्रीफ यांनी गोमातेचे विधिवत पूजन करत आरती केली.
यावेळी मुश्रीफ यांनी गोमातेचा विजय असो घोषणाही दिल्या.
कागल येथील कैदी चौकात झालेल्या या कार्यक्रमात हसनमुश्रीफ यांनी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
हसन मुश्रीफ यांचा अर्ज दाखल करताना माजी खासदार संजय मंडलिक आणि संजय घाटगे सुद्धा उपस्थित होते.
संजय मंडलिक यांनी मुलगा वीरेंद्र मंडलिक अर्ज दाखल करणार नसल्याचे सांगत मुश्रीफ यांना दिला दिला.