Lok Sabha Election Results 2024 : कच्चा लिंबू म्हणून हिणवलं, पण काँग्रेसच ठरला राज्यातील सर्वात मोठा पक्ष, सर्व 13 उमेदवारांची यादी!
धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचा विजय झाला असून त्यांनी भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरामटेकमध्ये काँग्रेसचे शामकुमार बर्वे बहुमताने विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या राजू पारवेंचा पराभव झाला आहे.
उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. तर भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला आहे.
लातूरचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे, डॉ. शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय झाला आहे. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे पराभूत झाले आहेत.
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचा विजय झाला आहे, तर भाजपच्या राम सातपुतेंचा पराभव झाला आहे.
गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेसच्या डॉ.नामदेव किरसान यांचा विजय झाला असून भाजपचे अशोक नेते पराभूत झाले आहेत.
जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा विजय झाला आहे.
नंदुरबारमध्ये काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी झाले आहेत. तर भाजपच्या हिना गावित यांचा पराभव झाला आहे.
काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला आहे.
अमरावतीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. अमरावतीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे बहुमताने निवडून आले आहेत.
कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज विजयी झाले आहेत. शिंदे गटाच्या संजय मंडलिकांचा पराभव झाला आहे.
चंद्रपूरमध्ये भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव केला.