MVA Seat Sharing : ठाकरेंच्या यादीतील चार जागांमुळं गोंधळाचं वातावरण, संजय राऊत म्हणाले दुरुस्ती करणार, नेमकं काय घडलं?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीनंतर मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाच वातावरण निर्माण झालं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमविआची जागा वाटपाची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचा दावा असलेल्या जागांवर ठाकरेंच्या सेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत.
सांगोला येथे दीपकराव साळुंखे, पाटणला हर्षद कदम, उरणमध्ये मनोहर भोईर, भूम परंडा या ठिकाणी रणजीत पाटील यांना ठाकरेंच्या सेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या महाविकास आघाडीत सांगोला- शेकाप, पाटण- राष्ट्रवादी, उरण- शेकाप, भूम परंडा- राष्ट्रवादी या जागांची चर्चा सुरू असतानाच सेनेच्या जागा जाहीर झाल्याने नाराजीचं वातावरण निर्माण झालं असल्याची माहिती आहे.
सध्या शेकाप आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांनी वरिष्ठाकडे नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती आहे. तर मतदारसंघातून सबंधित उमेदवाराना कार्यकर्त्यांचे प्रचंड फोन येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आमची 270 जागांवर सहमती झाली असून काही जागा ज्या आम्ही जाहीर केल्या असतील, आमच्या यादीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागांची नावं असतील तर त्यावर चर्चा सुरु आहेत. मविआ म्हणून एकत्र राहणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.