Lok Sabha Election Results 2024 : जरांगेंनी लावली वाट, भाजप भुईसपाट! मराठवाड्यातील विजयी उमेदवारांची यादी पाहा
लोकसभा निवडणुकीच्या निकालात यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे फॅक्टर दिसून आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा आरक्षणासंदर्भातील नाराजीमुळे मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीला निवडले आहे.
त्यामुळे भाजप पक्षाला या निवडणुकीच्या निकालात धक्का बसला आहे.
लातूरचा गड पुन्हा काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे, डॉ. शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय झाला आहे. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रृंगारे पराभूत झाले आहेत.
बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणेंचा दणदणीत विजय झाला आहे, तर भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या आहेत.
जालन्याच्या तिहेरी लढतीमध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा विजय झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे निवडून आले आहेत, तर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील देखील पराभूत झाले आहेत.
काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांचा नांदेडमध्ये विजय झाला असून भाजपच्या प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव झाला आहे.
परभणीत ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा विजय झाला आहे. तर महायुतीकडून महादेव जानकर यांचा पराभव झाला आहे.
धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या अर्चना पाटील यांचा पराभव झाला आहे.