बीडमध्ये विजयानंतर बजरंग बाप्पा मनोज जरांगेंच्या भेटीला
पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणे यांच्याविरोधात मोठी आघाडी घेतली होती.1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र, शेवटच्या फेऱ्यांमध्ये बजरंग सोनावणे यांनी मुसंडी मारली.
बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा तब्बल 7 हजारांनी पराभव केला.
बीड लोकसभेत पंकजा मुंडे यांना नमवण्याचा पराक्रम करणाऱ्या बजरंग सोनावणे यांना राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने जे वातावरण होते, त्याचा बराच फायदा झाला.
बीडमध्ये मराठा आरक्षणामुळे जातीय संघर्ष पाहायला मिळाला.
शरद पवार गट आणि मविआचे कार्यकर्ते, पदाधिकारी लोकांपर्यंत पोहोचले.
या सगळ्यांनी एकत्र येत राज्यात महायुतीविरोधात निर्माण झालेला असंतोष इन्कॅश करण्याचा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी ठरला.
बीडमध्ये विजय मिळाल्यानंतर बजरंग सोनावणे यांनी रात्रीच अंतरवाली सराटी गाठून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
रात्री अडीच वाजता बजरंग सोनावणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली.
या भेटीमुळे बीडमध्ये जरांगे फॅक्टरने बजरंग सोनावणे यांची ताकद वाढवल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.