2024 मध्ये पंतप्रधान मोदी ठरणार हिट की, इंडिया आघाडी मारणार बाजी? सर्वेक्षणाचे आकडे काय सांगतात?
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी एक ओपिनियन पोल आयोजित केला होता, ज्यामध्ये देशातील विविध राज्यांतील लोकांना विचारण्यात आलं होतं की, जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर I.N.D.I.A किंवा NDA मध्ये कोण जिंकेल?
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. ओपिनियन पोलनुसार, भाजप आणि भाजपचे इतर मित्रपक्ष 19-21 जागा, काँग्रेस आणि काँग्रेसचे इतर मित्रपक्ष 26-28 जागा आणि इतरांना 0-2 जागा मिळू शकतात. राज्यात भाजपला 37 टक्के, काँग्रेसला 41 टक्के आणि इतरांना 22 टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे.
बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत. सर्वेक्षणानुसार, येथे काँग्रेसची स्थिती एडीएपेक्षा चांगली आहे. येथे भाजपला 16-18 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इंडिया आघाडीला 21-23 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला 39 टक्के, काँग्रेसला 43 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळू शकतात.
देशात लोकसभेच्या सर्वाधिक जागा (80) उत्तर प्रदेशात आहेत. ओपिनियन पोलनुसार, येथे एनडीएला 73-75 जागा, काँग्रेस आणि सपाला 4-6 जागा आणि बसपाला 0-2 जागा मिळण्याची शक्यता आहे. यूपीमध्ये एनडीएला 49 टक्के, काँग्रेस आणि सपाला 35 टक्के, बसपाला 5 टक्के आणि इतरांना 11 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालबद्दल बोलायचं झालं तर येथील एकूण 42 जागांपैकी भाजपला 16-18 जागा मिळतील, टीएमसीला 23-25 जागा मिळतील, काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना 0-2 जागा मिळतील असा अंदाज आहे.
सर्वेक्षणानुसार, येथे भाजपला 39 टक्के, टीएमसीला 44 टक्के, काँग्रेस आणि मित्र पक्षांना 8 टक्के आणि इतरांना 9 टक्के मतं मिळू शकतात.
पंजाबबद्दल बोलायचं झालं तर येथील लोकसभेच्या एकूण 13 जागांपैकी भाजपला 0-2 जागा, काँग्रेसला 5-7 जागा, आम आदमी पार्टीला 4-6 जागा, शिरोमणी अकाली दलाला 0-2 जागा आणि इतरांना शून्य जागा मिळू शकतात. या राज्यात भाजपला 16 टक्के, काँग्रेसला 27 टक्के, आम आदमी पार्टीला 25 टक्के, शिरोमणी अकाली दलाला 14 टक्के आणि इतरांना 18 टक्के मतं मिळू शकतात.