Eknath Shinde Daregaon: ताप ओसरला, एकनाथ शिंदे दरेगावातील जननी आईच्या दर्शनाला; तीन दिवसानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री जनतेसमोर, Photo's
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात दरे गावातून ठाण्याला रवाना होणार आहे. (Image credit-ABP Majha)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्याला रवाना होण्यापूर्वी एकनाथ शिंदेंनी कुटुंबासह जननी मातेचं दर्शन घेतलं. (Image credit-ABP Majha)
गेल्या तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे दरेगावात मुक्कामी होते. (Image credit-ABP Majha)
दरेगावात आल्यापासून एकनाथ शिंदे यांना ताप आला होता. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. (Image credit-ABP Majha)
आज तीन दिवसांनंतर ताप कमी झाल्यानंतर एकनाथ शिंदे माध्यमांच्या समोर आले.(Image credit-ABP Majha)
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. (Image credit-ABP Majha)
एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाल्यानंतर ते विविध बैठकीत सहभागी होणार की नाही आणि महायुतीकडून पुढे कोणती पावलं उचलली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Image credit-ABP Majha)