Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
विधानसभेचा कार्यकाळ आज संपतो आहे, याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यासाठी एकनाथ शिंदेंसह महायुतीतील सर्व वरिष्ठ नेते राजभवनावर दाखल झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपावला.
तसंच महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री शपथ घेईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.
सध्या महायुतीतील तिन्ही पक्षांची इच्छा आहे की आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असावा, त्यामुळे मुख्यमंत्री पद कोणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आता मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार हे निश्चित असल्याचं बोललं जात आहे, परंतु एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत.
एकनाथ शिंदे पुढे मोठा निर्णय घेणार की महायुतीसोबतच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहावे, ही अनेकांची इच्छा आहे. यासाठी शिवसेना पक्ष देखील जोर देत असून अनेक ठिकाणी पूजा अर्चा आणि होम हवन देखील केले गेले आहेत.
मात्र दिल्लीत काय निर्णय होतो, अमित शाह काय निर्णय घेत यावर सर्व चित्र अवलंबून आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री पदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनाच बसवावं, यासाठी भाजपकडे मागणी केली गेली.
गेल्या अडीच वर्षात केलं गेलेलं काम पाहता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचं शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांचं मत आहे.
सुरुवातीचे किमान एक-दोन वर्ष तरी मुख्यमंत्री पद द्या, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत.
तोपर्यंत सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.
शिवाय महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.