Eknath Shinde: 'मुख्यमंत्री' म्हणून एकनाथ शिंदेंचा शेवटचा शासकीय सोहळा, फडणवीस-अजितदादाही सोबतीला
अवघ्या काही तासांत नवीन मंत्रिमंडळाची स्थापना केली जाईल, यात पुढचा मुख्यमंत्री कोण? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा आज शेवटचा शासकीय सोहळा पार पडला.
यानंतर मुख्यमंत्रिपदी कोणाचा चेहरा दिसणार हे अजून निश्चित नाही.
तत्पुर्वी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा आदरांजली कार्यक्रमाकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते.
26/11 च्या हल्ल्यात मुकाबला करताना शहीद झालेल्या जवानांना मुंबईच्या पोलीस मुख्यालयात आदरांजली देण्यात आली.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील उपस्थित होते.
याशिवाय मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अतिरिक्त गृहसचिव इकबालसिंग चहल, स्पेशल पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी देखील आदरांजली वाहिली.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शहिदांच्या स्मृती स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.
दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सर्व पोलिसांमार्फत पोलीस आयुक्तालयात मानवंदना देण्यात आली.
या शासकीय कार्यक्रमानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होणार आहेत.
पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस, अजित पवार की एकनाथ शिंदे? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. मुख्यमंत्री पदाच्या निर्णयानंतर या तीन पक्षांत सलोखा राहणार का आणि पुढील स्थिती कशी हाताळली जाणार की पुन्हा एक नाराजीनाट्य उभं राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.