December Planet Transit 2024 : डिसेंबरचा महिना 'या' 3 राशींसाठी ठरणार लकी; नोकरी, शिक्षण, व्यवसायात प्रगतीचे दार होणार खुले
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबरच्या महिन्यात ग्रहांच्या हालचालींत बदल होणार आहे. याचा प्रभाव देश-विदेशांत होणार आहे. तसेच,डिसेंबर महिन्यात सूर्य आणि मंगळ ग्रहाबरोबरच 4 ग्रहांच्या चालीत बदल होणार आहे. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सर्वात आधी 2 डिसेंबर रोजी शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 7 डिसेंबर रोजी मंगळ ग्रह कर्क राशीत वक्री होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच, 15 डिसेंबर रोजी सूर्य ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी बुध ग्रह वृश्चिक राशीत मार्गी होणार आहे. सर्वात शेवटी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी शनी कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. यामुळे अनेक राशींच्या हालचालीत बदल होणार आहेत. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
चार ग्रहांचं संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.
व्यापारी वर्गातील लोकांना या काळात नवीन व्यवसाय सुरु करायचा असल्यास करु शकता. त्याचबरोबर, या काळात तुम्हाला पैसे गुंतण्यासाठी चांगली संदी मिळू शकते.
सिंह राशीच्या लोकांसाठी 4 ग्रहांच्या हालचालीत बदल झाल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी फार लाभदायक ठरु शकतो. तसेच, या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, कुटुंबात तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे.
तसेच, या ग्रह संक्रममाच्या काळात तुम्ही तुमच्या आरोग्याची देखील योग्य काळजी घ्यावी. त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना फार लाभदायक असणार आहे. या दरम्यान कामाच्या ठिकाणी तुमच्यावर अनेक नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी मिळतील.
तसेच, व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. व्यवसायाचा तुमचा चांगला विस्तार होईल. तसेच, आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)