Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Share Market : शेअर बाजारात लाल चिखल! लोअर सर्किटमुळे 'या' दिग्गज शेअर्सची राखरांगोळी, शेअरहोल्डर्सचे कोट्यवधी बुडाले!
आज शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. लाचखोरी आणि फसवणुकीच्या एका प्रकरणात गौतम अदानींना अमेरिकन कोर्टाने दोषी ठरवलं, त्यानंतर आज अदानी समूहाचे शेअर्स घसरताना दिसत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाजार उघडताच अनेक शेअर्समध्ये लोअर सर्किट दिसून आलं. अदानीसह जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, SBI, TATA MOTORS, मार्सन्स, Ls इंडस्ट्रीज यासह अनेक शेअर्सला लोअर सर्किट लागलं आहे.
आज जवळपास 60 टक्के शेअर्सला लोअर सर्किट लागलं आहे. या कंपन्या कोणत्या? पुढे पाहूया
अमेरिकेच्या आरोपांमुळे अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. यासह अनेक शेअर्सला लोअर सर्किट लागलं आहे.
अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी आणि अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत, ज्याचा फटका संपूर्ण शेअर बाजाराला बसला आहे.
अमेरिकेच्या आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या मालकीच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. यासह बाजार उघडताच इतर अनेक शेअर्समध्येही लोअर सर्किट दिसून आलं.
अदानी ग्रुपचे शेअर्स आज 20 टक्क्यांनी घसरले. शेअर्सच्या या घसरणीमागे गौतम अदानी यांच्यावर लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप झाल्याचं कारण आहे. गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप देखील आहे
आज सेन्सेक्समध्ये 356 अंकांची घसरण झालीये, तर निफ्टीमध्ये 144 अंकांची घसरण दिसून येतेय.
आजच्या टॉप गेनर्समध्ये INFY, TECHM, HCLTECH, TCS, POWERGRID यांचा समावेश आहे. तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये ADANIPORTS, SBI, NTPC, TATAMOTORS, MARUTI यांचा समावेश आहे.
कोणकोणत्या कंपन्यांना लोअर सर्किट? : अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी विल्मार, जेएसडब्ल्यू होल्डिंग्ज, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर, मार्सन्स, Ls इंडस्ट्रीज, ज्योती स्ट्रक्चर्स, वेरिटास इंडिया, HMT, RIR पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, व्हरांडा लर्निंग सोल्यूशन्स, ऑलसेक टेक्नॉलॉजीज, व्हीएल ई-गव्हर्नन्स आणि सोल्युशन्स, अद्वैत इन्फ्राटेक, इलेक्ट्रोथर्म इंडिया, GVK पॉवर आणि इन्फ्रास्ट्रक्चर, हरक्यूलिस Hoists, RPP इन्फ्रा Projects, क्रोनोक्स लॅब सायन्सेस, महामाया स्टील इंडस्ट्रीज, राठी स्टील आणि पॉवर, मेडिको रेमिडीज, व्ह्यूनो इन्फ्राटेक, A1 ऍसिड, प्रॅक्सिस होम रिटेल, झी लर्न, RTS पॉवर कॉर्पोरेशन, Oxygenta फार्मास्युटिकल, सयाजी हॉटेल्स पुणे, मॅक्सिमस इंटरनॅशनल, सामोर रियल्टी, मोहिते इंडस्ट्रीज, BN होल्डिंग्ज, रिलायन्स होम फायनान्स,