टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात यंदा काका विरुद्ध पुतण्या लढत रंगतदार होत आहे. त्यामुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बारामतीत सभांवर जोर देत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयुगेंद्र पवार यांनीही प्रचारसभा आणि गावभेटींमधून मतदारसंघ पिंजून काढला असून आज सकाळी त्यांनी आत्या सुप्रिया सुळे यांच्या मुलीसोबत म्हणजे आतेबहिणीससह मॉर्निंग वॉक केला.
युगेंद्र यांनी बारामती शहरातील पुनावाला गार्डन समोरील शिंदे बंधुंचे चंद्रकांत हेअर सलूनला भेट देऊन त्यांच्याशी गप्पा मारल्या. तसेच त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बारामती शहरातील राजू बागवान यांच्या फ्रुट स्टॉलला भेट दिली, तसेच त्यांच्याशी गप्पा मारल्या. याप्रसंगी त्यांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
बारामती शहरातील पुनावाला गार्डन समोरील पियुष चहा स्टॉलला भेट देऊन गरमागरम चहाचा आस्वाद घेतला. तसेच त्यांच्या व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आसलकर बंधुंचे गणेश पुरीभाजी सेंटर येथे गरमागरम पुरीभाजीचा आस्वाद घेतला. तसेच आसलकर बंधुंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांना व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही यंदाची विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून पुतण्याविरुद्ध वस्ताद मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. नातू युगेंद्र यांच्यासाठी शरद पवार बारामतीत भाकरी फिरवत आहेत.